बीड जिल्ह्यात आज 375 पॉझिटिव्ह:प्रत्येक ठिकाणी शंभरीच्या आत आकडे
बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3652 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 375 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3477 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 26 आष्टी 54 बीड 77 धारूर 7 गेवराई 51, केज 42 माजलगाव 26 परळी 16 पाटोदा 28, शिरूर 36 वडवणी 12 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातल्या करोना रुग्णांची आकडेवारी उलट्या क्रमानं घसरू लागली
मंगळवारी दिवसभरात राज्यात १४ हजार १२३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५४ लाख ३१ हजार ३१९ इतका झाला असून रिकव्हरी रेट थेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना मृतांची रुग्णांची संख्या आता ९६ हजार १९८ इतकी झाली आहे. तसेच, राज्याचा मृत्यूदर देखील १.६७ टक्के झाला आहे.
दरम्यान, आजच्या १४ हजार १२३ नव्या करोनाबाधितांसोबत राज्यात आजपर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ इतकी झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे त्यात २ लाख ३० हजार ६८१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.