बीड

बीड जिल्ह्यात आज 516 पॉझिटिव्ह:बीड तालुक्यात 218

बीड जिल्ह्यात आज दि 31 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4200 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 516 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3684 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 18 आष्टी 57 बीड 218 धारूर 14 गेवराई 49, केज 22 माजलगाव 26 परळी 6 पाटोदा 58, शिरूर 26 वडवणी 22 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात २४ तासात १८ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. राज्यात रविवारी २२ हजार ५३२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३.५५ टक्के इतकं झालं आहे. तर मागच्या २४ तासात १८ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यात एकूण २ लाख ७१ हजार ८०१ सक्रीय रुग्ण आहेत. करोनामुळे राज्यात एका दिवसात ४०२ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.६५ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील करोना पॉझिटिव्हीटी दर १६.४४ टक्के इतका आहे.

देशात२४ तासांत १ लाख ५२ हजार ७३४ करोनाबाधित रुग्ण आढळले

नवी दिल्ली : देशात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या आणि मृत्यूंच्या संख्येत मे महिन्याच्या अखेरीस घट झालेली दिसून येतेय. ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (३० मे २०२१) १ लाख ५२ हजार ७३४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ३१२८ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ३८ हजार ०२२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या २० लाख २६ हजार ०९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार १०० वर पोहचलीय.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२
उपचार सुरू : २० लाख २६ हजार ०९२
एकूण मृत्यू : ३ लाख २९ हजार १००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *