बीड

बीड जिल्ह्यात आज 509 पॉझिटिव्ह:कोरोना कंट्रोल होतोय:आष्टी,बीडलाच अधिक

बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4791 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 509 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4282 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 31 आष्टी 102 बीड 121 धारूर 17 गेवराई 48, केज 54 माजलगाव 37 परळी 8 पाटोदा 38, शिरूर 32 वडवणी 21 असे रुग्ण आढळून आले आहेत.

दिलासा! राज्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख खाली

मुंबई: राज्यात शनिवारी २० हजार २९५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ४४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण ३ कोटी ४६ लाख ०८ हजार ९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख १३ हजार २१५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १६.५१ इतके आहे. सध्या राज्यात २० लाख ५३ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर १४ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच ज्यांच्याव उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार ५७३ इतकी आहे.
आज राज्यात एकूण ४४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

चांगली बातमी! देशात ४६ दिवसांत करोनाचे सर्वात कमी रुग्ण, सर्वाधिक रुग्ण बरे

नवी दिल्लीः देशात गेल्या २४ तासांत १ लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्ण ( coronavirus india update today ) आढळले. यादरम्यान ३४६० जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. सलग १० व्या दिवशी करोना संसर्गाचा दर हा देशात १० टक्कांच्या खाली ( new covid19 cases ) आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात सध्या २१ लाख १४ हजार ५०८ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ७६ हजार ३०९ नागरिक करोनातून मुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार गेल्या २४ तासांत ३० लाख ३५ हजार ७४९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशात आतापर्यंत एकूण २१,२०,६६, ६१४ जणांचे लसीकरण झाले आहे.
देशात करोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर हा ८.०२ टक्के आहे. गेल्या सहा दिवसांपासून हा पॉझिटिव्ही दर १० टक्क्यांच्या आत आहे.गेल्या ४६ दिवसांमध्ये करोनानेचे आज सर्वात कमी रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय सलग १७ व्या दिवशी करोनाचे सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *