बीड

बीड जिल्ह्यात आज 536 पॉझिटिव्ह:कोरोना कमी होतोय

बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5679 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 536 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5143 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 19 आष्टी 73 बीड 153 धारूर 22 गेवराई 53, केज 57 माजलगाव 46 परळी 12 पाटोदा 23, शिरूर 52 वडवणी 26 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात रुग्ण संख्या घटली:बरे होण्याचे प्रमाण दुप्पट

शुक्रवारी दिवसभरात राज्यात एकूण २० हजार ७४० नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० इतका झाला आहे. मात्र, त्यातले फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात करोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, राज्यातील मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून ५०० च्या खाली उतरला आहे. आज दिवसभरात राज्यात ४२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर १.६४ टक्के इतका झाला आहे.

Covid19: देशात एका दिवसात १.७३ लाख रुग्ण

नवी दिल्ली : शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२८ मे २०२१) १ लाख ७३ हजार ७९० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा गेल्या ४५ दिवसांतला सर्वात कमी आकडा आहे. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ३६१७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ८४ हजार ६०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या २२ लाख २८ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ५१२ वर पोहचलीय.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११
उपचार सुरू : २२ लाख २८ हजार ७२४
एकूण मृत्यू : ३ लाख २२ हजार ५१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *