पत्रकारिता कुणाच्या बापाची जहागिरी नाही?जो लिहतो तो पत्रकार असतो
मी नाही त्यातली अन कडी लावा आतली असा सळसूदपणाचा आव आणत काही महाभाग पत्रकार आपणच कसे खरे पत्रकार हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत,दिव्या खाली किती अंधार आहे हे न पाहता दुसऱ्यांच्या चुली बंद करायला निघाले,पत्रकारिता करणे म्हणजे यांच्या बापाची जहागिरी असल्याचे यांना वाटू लागले आहे,पण जो समाजासाठी,जनहितासाठी आणि पत्रकारितेचे वृत्त घेऊन लेखणी चालवतो तो पत्रकार असतो,पत्रकारिताची परिभाषा कुणीच ठरवू शकत नाही,घटनेने दिलेल्या अधिकारात कोणत्याही माध्यमातून मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहेच,जर खोटेपणा आढळत असेल तर यासाठी कायद्याची दारे उघडी आहेतच बोगस किंवा ब्लॅकमेल करणारा कोण हे जनता आणि कायदा ठरवेल,गुन्हेगाराला शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे त्यामुळे ते कायद्याला ठरवू द्या,आपण सत्याच्या मार्गावर जर चालत आहोत तर भीती कशाला बाळगता,जे स्वातंत्र्य तुम्हाला आहे ते इतरांनाही आहे हे लक्षात ठेवावे इतरांकडे बोट दाखवत असताना चार बोटे आपल्याकडेच असतात याचे भान ठेवावे
पत्रकार खरा की खोटा हे कुण्या एका व्यक्तीचे किंवा संघटनाचे काम नाही तो अधिकार जनतेचा आहे जनता ठरवेल की खरा कोण खोटा कोण जो आपली लेखणी सामाजिक जाणिव ठेऊन अविरत चालवतो तोही एक पत्रकारच असतो, जर कुणी पत्रकारितेच्या नावाखाली बोगसगिरी करत असेल तर त्याच्यावर कारवाई ज्याला अनुभव आला किंवा ज्याला ब्लॅकमेल केले त्याने सरळ कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करावी,
यानिमित्त एक ना अनेक प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत
बोगस पत्रकार ठरवण्याचा अधिकार एखाद्या संघाला दिला कुणी?
केवळ व्हाट्स अप अंक प्रकाशित करून शासनाची दिशाभूल करत आम्हीच खरे पत्रकार हे दाखवण्याचा अधिकार दिला कुणी?
शासकीय यादीत समावेश व्हावा म्हणून ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांना खोटे आकडेवारी दाखवण्यात आली त्या दैनिकावर कारवाई कोण करणार?
आर एन आय प्रमाणपत्र असले म्हणजेच अधिकृत दैनिक हे मान्य असले तरी प्रकाशन करायला शासन पैसे देतो का?
नियमित अंक तेही रेकॉर्ड पुरते काढले म्हणजेच खरे संपादक किंवा पत्रकार हे कुणी ठरवले?
गोरगरीब पत्रकार वेगवेगळ्या मार्गाने का होईना पण स्वतःचा उदरनिर्वाह सांभाळून पत्रकारिता करतात त्यांचे जीवन उध्वस्त करणारी मागणी करण्याचा घाट का बांधला जात आहे?
पत्रकारिता करण्याचा ठेका काय फक्त यांनीच घेतला का ?
सोशल मीडिया माध्यमातून आजही दैनिकापेक्षा अनेक डिजिटल साईट वाचकांपर्यंत पोहचतात हे कुणीही मान्य करेल
अशी मागणी केवळ भीतीपोटी तर केली जात नाही ना ?
ज्यांनी मागणी केली त्यांच्या दैनिकाच्या खपाची आणि सत्यतेची पडताळणी केली तर खरे हेच बोगस आढळून येतील त्याची चौकशी कोण करणार?
स्वतःचा धंदा बसू लागल्याने आपल्याच पत्रकार बंधूंच्या जीवावर उठणे हे कितीपत योग्य आहे?
10 पत्रकारांनी मागणी केली म्हणजे जिल्ह्यातील पत्रकाराची मागणी आहे असे समजू नये
कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या पत्रकारांनी ब्लॅकमेल केले त्यांची नावे का जाहीर केले नाहीत?
बोगस संपादक व अनधिकृत पत्रकार कोणते याची यादी का जाहीर केली नाही
सर्व सामान्य अवस्थेत जगणाऱ्या पत्रकारांचे जीवन उध्वस्त करण्याचा यांना कुणी अधिकार दिला,माध्यम स्वातंत्र, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून इतरांनी जगूच नये अशी वृत्ती जर पत्रकार संघटना ठेवत असतील तर नक्कीच विरोध केला जाईल असा इशारा काही पत्रकारांनी दिला आहे तर वरील प्रश्नाबाबत लवकरच निवेदन देऊन सविस्तर चौकशी व ऑडिट करून कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे,इतरांसाठी खड्डे खोदण्यापूर्वी आपण किती खाली आहोत याचाही विचार करायला हवा होता,