बीड

बीड जिल्ह्यात आज 603 पॉझिटिव्ह:बीडचाआकडा दिडशे:वडवणी,परळीत कमी

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5588 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 603 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4985 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 55 आष्टी 78 बीड 165 धारूर 30 गेवराई 58, केज 65 माजलगाव 50 परळी 12 पाटोदा 26, शिरूर 49 वडवणी 14 असे रुग्ण आढळून आले आहेत.

Corona Updates:In maharashtra

मुंबई : राज्यात बुधवारी घरी बरे होऊन गेलेल्यांपेक्षा नवीन कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दुसरीकडे काही राज्यात मृत्यूचे प्रमाण शून्यावर आल्याने दिलासा मिळाला आहे.

बुधवारी 24,752 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 23,065 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन आकडेवारीत रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे. राज्यात एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 52,41,833 रुग्ण बरे झाले आहेत.यामुळे Recovery Rate 92.76% टक्के आहे. राज्यात बुधवारी 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.62 टक्के आहे.

देशामध्ये एकूण 11 हजार 717 जणांना ब्लॅक फंगसची लागण

नवी दिल्ली – देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.

हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात 25 मे 2021 रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे.

देशामध्ये आतापर्यंत एकूण 11 हजार 717 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रामधील असल्याचं दिसून आलं आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गुजरातमध्ये 2859, महाराष्ट्रात 2770, आंध्र प्रदेशमध्ये 768, मध्य प्रदेश 752, तेलंगणा 744, उत्तर प्रदेश 701 आणि राजस्थानमध्ये 492 ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *