बीड जिल्ह्यात आज 703 पॉझिटिव्ह:बीडचा आकडा आज सव्वादोनशे
बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5501 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 703 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4798 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 42 आष्टी 92 बीड 226 धारूर 25 गेवराई 66, केज 64 माजलगाव 30 परळी 15 पाटोदा 46, शिरूर 63 वडवणी 33 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात २४ हजार १३६ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रोजच्या नव्या करोना बाधित रुग्णांची संख्येत घसरण होत असल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. २४ तासांत राज्यात २४ हजार १३६ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. एकूण ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत असून ती काल ३ लाख १४ हजार ३६८ वर आली आह
काल राज्यात एकूण ६०१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात काल ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होतेय घट
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख १४ हजार ३६८ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.