बीड

45 वयाच्या पुढील नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण सुरू

कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात
कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे
• उपलब्ध लस साठयानुसार स्वा.रा.ती.वै.म.व रु अंबाजोगाई येथे १३००, जिल्हा रुग्णालय बीड १३००, उपजिल्हा रुग्णालय गेवराई,परळी, केज येथे प्रत्येकी ८००, ग्रामीण रुग्णालय,माजलगाव,धारुर,पाटोदा,आष्टी येथे प्रत्येकी ५५०, ग्रामीण रुग्णालय तालखेड,चिंचवण,धानोरा,नांदुरघाट,रायमोहा,स्त्री रुग्णालय नेकनुर येथे प्रत्येकी ४००, प्रा.आ.केंद्र ग्रामीण,नागरी रुग्णालये,पोलीस हॉस्पीटल येथे प्रत्येकी ३२० या प्रमाणे
उपलब्ध २७८४० कोव्हीशिल्ड लसीचे जिल्हयात वितरण करण्यात आले आहे.
• दि.२४/५/२०२१ रोजी सर्व प्रा.आ.केंद्र, नागरी रुग्णालये,पोलीस हॉस्पीटल ,ग्रामीण
रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय बीड,स्वा.रा.ती.वै.म.व रु अंबाजोगाई वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी पहील्या डोसकरीता लसीकरण सत्र
आयोजित करण्यात आले आहेत.
• Ezee app वर नोंदणी केलेल्या नागरीकांना SMS/Whatsapp messages दवारे नागरीकांना लसीकरणाकरीता बोलावण्यात येत आहे.
• ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी Ezee app वर नोंदणी करुन
लसीकरणाकरीता टोकन क्रंमाक प्राप्त करुन घ्यावा , टोकन क्रंमाकानुसार प्राप्त मेसेज नुसार लसीकरण करावे,मेसेज नुसार लसीकरणाकरीता न आल्यास परत टोकन क्रंमाक
प्राप्त करुन घ्यावा लागेल.
• ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी घरबसल्या Ezee app
https:ezee.live/Beed-covid19-registration या लिंकवर वर कोविड
लसीकरणाकरीता नोंदणी करावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.असे डॉ राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड.यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *