बीड जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्ष पदी प्रदीप चितलांगे यांची निवड.
माहेश्वरी सभेच्या जिल्हा अध्यक्ष पदी बीड येथील उद्योजक प्रदीप चितलांगे यांची निवड झाली. करोना महामारी च्या पार्श्वभूमी वर त्यांनी मावळते अध्यक्ष सिए गोपालजी कासट यांचे कडुन एका छोटे खानी कार्यक्रमात पदभार स्विकारला, यापुर्वी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष, लायन क्लब चे विभागीय अध्यक्ष आदी सामाजीक पदांवर त्यांनी यशस्वी रित्या कार्य केलेल असुन द्वा.मंत्री बॅकेचे ते संचालक आहेत.
सशक्त समाज व त्याकरीता संपुर्ण माहेश्वरी समाजाचे लवकरात लवकर करोना लसीकरण ही आपली प्राथमीकता व प्राधान्य असल्याची भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
या छोटेखानी कार्यक्रमास प्रदेश सभेचे सदस्य दिनेशजी मुंदड़ा यांची उपस्थिति होती , त्यांच्या या नियुक्ती चे समाजातील विवीध घटकांकडुन अभिनंदन होत आहे.