बीड

आज दिलासा:बीड जिल्ह्यात आज 720 पॉझिटिव्ह:राज्याला कोरोना लढाई जिंकण्यात यश

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3715 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 720 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2995 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 61 आष्टी 100 बीड 48 धारूर 70 गेवराई 66, केज 102 माजलगाव 71 परळी 35 पाटोदा 71, शिरूर 76 वडवणी 20 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्याला करोना विरुद्धची लढाई जिंकण्यात यश

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या आजही ३० हजारांच्या खाली राहिली. गेल्या २४ तासांत राज्यात २९ हजार ९११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४७ हजार ३७१ रुग्ण करोनावर मात करून आज घरी परतले आहेत. आतापर्यंत तब्बल ५० लाखांहून अधिक रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे.

राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२ टक्क्यांकडे सरकले आहे. राज्यात एकवेळ सक्रिय रुग्णसंख्या ७ लाखांच्या जवळ पोहचली होती. हा आकडा झपाट्याने खाली आला असून सध्या ४ लाखांपेक्षाही कमी सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. करोना मृत्यूंचे प्रमाण ही मात्र आजही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आणखी ७३८ रुग्णांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत या आजाराने ८५ हजार ३५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाची कालची स्थिती:

  • राज्यात काल ७३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.
  • काल राज्यात २९ हजार ९११ नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • आतापर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३ टक्के एवढे.

देशात करोनाबाधितांच्या संख्येत घट

नवी दिल्ली : करोना संक्रमणाचा वेग हळूहळू का होईना पण मंदावताना दिसतोय. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गुरुवारी (२० मे २०२१) २ लाख ५९ हजार ५९१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५७ हजार २९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
एका दिवसात ४२०९ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण २ लाख ९१ हजार ३३१ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ वर पोहचलीय. तर मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३० लाख २७ हजार ९२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५
उपचार सुरू : ३० लाख २७ हजार ९२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *