महत्वाचे:SBI च्या सर्व ग्राहकांची UPIसह डिजिटल सेवा दोन दिवस बंद राहणार
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे. यामध्ये बँकेची डिजिटल सेवा काही काळासाठी बंद राहण्याविषयी सांगितले गेले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खातेधारकांनी लवकर कामे उरकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
SBIने आपल्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून माहिती दिली की, ग्राहकांना कोणत्याही तसदीविना डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्या अपडेट करण्यात येत आहेत. त्याकरीता 21 मे ला 10.45 PM ते 23 मे 1 AM पर्यंत संकेतस्थळ मेंटनन्ससाठी बंद असणार आहे. या दरम्यान ग्राहक INB/YONO/YONO Lite/UPI या सर्व्हिसेसचा वापर करू शकणार नाही.
मेंटनन्सच्या कामादरम्यान, ग्राहकांना UPI सेवेच्या माध्यमातून व्यवहार करता येणार नाही. अशातच तुम्हाला कोणतेही व्यवहार करायचे असल्यास त्याआधी उरकून घेण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.
याआधी SBIने आपल्या 44 कोटी ग्राहकांना KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 मे पर्यंत वाढवल्याचे सांगितले आहे.