बीड

बीड जिल्ह्यात आज 992 पॉझिटिव्ह:राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3877 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 992 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2885 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 70 आष्टी 114 बीड 129 धारूर 53 गेवराई 94, केज 103 माजलगाव 54 परळी 55 पाटोदा 167, शिरूर 128 वडवणी 25 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा ग्राफ उतरता असून आजही नवीन बाधितांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. गेल्या २४ तासांत राज्यात ३४ हजार ३१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५१ हजार ४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा अजूनही मोठा असून आज राज्यात ५९४ रुग्णांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आसपास आहे. त्याचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या आता ४ लाखांपर्यंत खाली आली आहे. ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढून आता ९१ टक्क्यांच्यावर गेले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची (Corona Cases in India) भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा आदल्या दिवशी नोंदवलेल्या एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींच्या विक्रमापेक्षा जवळपास 650 ने कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *