बीड

बीड जिल्ह्यात आज 975 पॉझिटिव्ह:राज्यात कोरोना कमी तर देशात बळींची संख्या अधिक

बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4068 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 975 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3093 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 79 आष्टी 94 बीड 327 धारूर 56 गेवराई 70, केज 108, माजलगाव 53 परळी 30 पाटोदा 88, शिरूर 49 वडवणी 21 असे रुग्ण आढळून आले आहेत.

काल राज्यात २८ हजार ४३८ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यातील करोना रुग्णवाढीला मोठ्या प्रमाणात ब्रेक लावण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपर्यंत रुग्णसंख्या खाली आली आहे. काल राज्यात २८ हजार ४३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५२ हजार ८९८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, करोना मृत्यूंचे प्रमाण ही आजही चिंतेची बाब असून गेल्या २४ तासांत राज्यात करोनाने ६७९ रुग्ण दगावले आहेत.

राज्यातील करोनाची दुसरी लाट गेल्या काही दिवसांपासून ओसरताना दिसत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज एका कार्यक्रमात बोलताना तसे विधान केले. त्याचवेळी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर करोनाची आकडेवारी हाती आली असून दैनंदिन रुग्णसंख्या आजही ३० हजारच्या खाली राहिली आहे.

करोनाची कालची स्थिती:

  • राज्यात ६७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे.
  • आज २८ हजार ४३८ नवीन रुग्णांचे निदान.
  • ५२ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • आजपर्यंत एकूण ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ % एवढे झाले आहे.

देशात गेल्या 24 तासांत 267,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा भयावह असून दिवसेंदिवस हा आकडा उच्चांक गाठत आहे. या आकड्यानं जगभरातील इतर अनेक देशांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले होते. परंतु, आता भारतानं हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 267,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 4529 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर 3,89,851 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत 12 जानेवारी रोजी जगभरात सर्वाधिक 4468 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

18 मेपर्यंत देशभरात 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 13 लाख 12 हजार 155 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20.08 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्क्यांहून अधिक आहे.

देशातील आजची कोरोना स्थिती :

एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 54 लाख 96 हजार 330
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 19 लाख 86 हजार 363
एकूण सक्रिय रुग्ण : 32 लाख 26 हजार 719
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 83 हजार 248

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *