बीड

दिलासा:आज बीड जिल्ह्यात 1131 जण झाले कोरोनामुक्त

बीड जिल्ह्यात दि 18 सोमवारी 1184 कोरोनामुक्त

बीड- जिल्ह्यात आज 1131 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही चांगले आहे

नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही,जिल्हा प्रशासन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1131 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

सध्या बीड जिल्ह्यात 76726 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 68991 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 16.37% असून बरे होण्याचे प्रमाण 89,91%आहे तर मृत्यू दर 1.99% आहे

सध्या 6887 बेड शिल्लक असून सध्या 6204 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 13091 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 170 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे, सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 1531 रुग्ण दगावले आहेत 24 तासात 14 रुग्णाचा मृत्यू झाला आहे ,आज 61 दगावलेल्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण 75 जणांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *