बीड

बीड जिल्ह्यात आज 1186 पॉझिटिव्ह तर काल1184 कोरोनामुक्त

बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4401 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1186 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3215 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 81 आष्टी 89 बीड 284 धारूर 60 गेवराई 119, केज 134, माजलगाव 67 परळी 44 पाटोदा 220, शिरूर 63 वडवणी 25 असे रुग्ण आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यात दि 17 सोमवारी 1184 कोरोनामुक्त

बीड- जिल्ह्यात आज 1184 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही चांगले आहे

नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही,जिल्हा प्रशासन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1184 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

सध्या बीड जिल्ह्यात 75540 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 67785 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 16.84% असून बरे होण्याचे प्रमाण 89,73%आहे तर मृत्यू दर 1.92% आहे

सध्या 6737 बेड शिल्लक असून सध्या 6299 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 13036 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 166 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे, सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 1456 रुग्ण दगावले आहेत 24 तासात 33 रुग्णाचा मृत्यू झाला आहे

राज्यात सोमवारी (17 मे) कोरोनाचे 26,616 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 516 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 54,05,068 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 82,486 वर पोहोचला आहे. तब्बल 48 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 48,74,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 4,45,495 जणांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 54 लाखांवर गेली असून आतापर्यंत 82 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *