बीड

बीड जिल्ह्यात आज 1118 पॉझिटिव्ह:सर्वात बीडचा आकडा मोठा

बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4403 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1118 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3285 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 67 आष्टी 96 बीड 330 धारूर 80 गेवराई 86, केज 105, माजलगाव 96, परळी 35 पाटोदा 125, शिरूर 66 वडवणी 32 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात करोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली

मुंबई : करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राची स्थिती हळूहळू सुधारत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज रुग्ण बरे होणाऱ्या संख्येत वाढ झाली आहे. आज ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर राज्यात आज करोनाच्या ३४ हजार ३८९ नवीन रुग्णाांचे निदान झाले आहे.
महाराष्ट्रावरील करोनाचं संकट अद्याप दूर झालेलं नसली तरीही दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या रुग्णसंख्येने काहीसा दिलासा मिळत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात दररोज साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण

गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात काल दिवसभरात तीन लाख ११ हजार १७० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ६२ हजार ४३७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *