बीड

बीड जिल्ह्यात आज 1112 पॉझिटिव्ह:बीडचा आकडा दोनशेच्या पुढेच

बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4783 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1112 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3671 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 119, आष्टी 129 बीड 238 , धारूर 68, गेवराई 111, केज 121, माजलगाव 91, परळी 54, पाटोदा 98, शिरूर 66, वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यात कालच्या तुलनेत काल रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहयला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४२ हजार ५८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आज ८५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. राज्यात काल ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख ५४ हजार ७३१ इतकी झाली आहे. परंतु आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात मोठी घट झाल्याचे यला मिळत आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ३३ हजार २९४ वर पोहोचली आहे.

कोरोनाचे संक्रमण कमी होऊ लागले

नवी दिल्ली : देशात करोना संक्रमण घातल असलेलं थैमान आता हळूहळू ओसरताना दिसतंय. गेल्या काही दिवसांत करोना संक्रमित रुग्णांची संख्या थोडी कमी झालेली दिसतेय. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (१३ मे २०२१) ३ लाख ४३ हजार १४४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४००० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ४० लाख ४६ हजार ८०९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ६२ हजार ३१७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी ०० लाख ७९ हजार ५९९ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख ०४ हजार ८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *