महिना झाला सगळं बंद तरी बीड जिल्ह्यात आज 1015 पॉझिटिव्ह तर 1317 कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4283 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1015 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3238 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 130, आष्टी 129, बीड 256 , धारूर 60, गेवराई 91, केज 139, माजलगाव 51, परळी 45, पाटोदा 38, शिरूर 52, वडवणी 24 असे रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी 816 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.4 टक्के एवढा आहे.
24 तासात देशात कोरोना च्या 3,62,727 नवीन रुग्णसंख्येची भर
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोना च्या 3,62,727 नवीन रुग्णसंख्येची भर पडली असून 4,120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी देशात 3.48 लाख नवीन रुग्णांची भर पडली होती तर 4,205 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 1.09 टक्के इतकं झालं आहे तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 83 टक्के झालं आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 37 लाख 03 हजार 665
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 97 लाख 34 हजार 823
एकूण सक्रिय रुग्ण : 37 लाख 04 हजार 099
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 54 हजार 197