बीड

बीड जिल्ह्यात आणखी 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन:फक्त अत्यावश्यक सेवाच चालू राहणार-जिल्हाधिकारी यांचा आदेश

ज्याअर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधिल तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करणेत आलेली आहे. आणि त्याबाबतची नियमावली तयार प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधिल
तरतुदींप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्तीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. ज्याअर्थी, जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, मी रविंद्र जगताप, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड मला प्राप्त अधिकारानुसार तसेच फौजदारी प्रक्रीया संहीता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून कोविड-
१९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक १५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
१. दिनांक १५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील.

सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत
मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.
२. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
३. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील.
४. बँक/ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु.०१.०० वाजेपर्यंत केवळ शासकीय
व्यवहार, पेट्रोलपंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे

व्यवहार, सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा-या आस्थापना
यांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल. दरम्यानच्या काळात एटीएम कँशच्या वाहनांना परवानगी असेल. तसेच दुपारी ०१.०० ते ०४.४५ वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल.
५. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील.(ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.)
६. लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तींचा दुसरा डोस साठी मेसेज आला आहे,/आरोग्य विभागाचे पत्र आले आहे.
त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल. (लसीकरणासाठी आलेला मेसेज/आरोग्य विभागाचे पत्र,
आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल)
७. कृषी व्यवसायाशी संबंधित बि-बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि-बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल.
८. नरेगाची कामे सुरु राहतील. त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर चा व कोविड -१९ विषयक जे नियम
आहेत ते पाळणे बंधनकारक असेल,
९. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक १६.०५.२०२१ ते २०.०५.२०२१ या कालावधीत केवळ गोडाऊन ते स्वस्त धान्य दुकान किंवा गोडाऊन या ठिकाणी माल उतरुण घेणे व दिनांक २१.०५.२०२१ पासुन सकाळी ०७.०० ते ११.०० या
वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. (राशनसाठी जाणा-या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे.)
१०. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील.
दिनांक १५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यत या कालावधीत निबंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित
विभागाची राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाचा अंमल दिनांक १५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० पासुन राहील. सदरचे आदेश दिनांक १३/०५/२०२१ रोजी (रविंद्र जगताप) जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी काढले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *