दोन दिवसात फिरणारे सापडले 53 पॉझिटिव्ह तर 2561 जण कोरोनामुक्त:50 जणांचा मृत्यू
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची अँटी जेन तपासणी करण्यात आल्यानंतर दोन दिवसात 53 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत काल 23 तर आज सोमवारी 30 जण सापडले आहेत तेव्हा रस्त्यावर कोरोना आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे दिलासादायक बाब म्हणजे काल 1344 आणि आज सोमवारी 1217असे एकूण 2561 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत
आजही दिलासादायक बातमी:बीड जिल्ह्यात 1217 जण झाले कोरोनामुक्त
जिल्हा प्रशासन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1217 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे
सध्या बीड जिल्ह्यात 67720 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 59997 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 15.63% असून बरे होण्याचे प्रमाण 88.58 %आहे तर मृत्यू दर 1.71 % आहे
सध्या 6343 बेड शिल्लक असून सध्या 6573 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 12916 बेडची व्ययस्था करण्यात आली आहे, आज 4 नवीन कोविड सेन्टरची व्यवस्था करण्यात आली जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 163 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे, सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 1160 रुग्ण दगावले आहेत
दुर्दैवाने आज 15 तर आणि जुन्या अपडेट नुसार 35 असे 50 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर आहे काल 1110 ही संख्या होती