बीड जिल्ह्यात आज 1273 पॉझिटिव्ह:गेवराईत कोरोनाचा कहर
बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4270 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1273 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2997 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 152 आष्टी 43 बीड 295 धारूर 32 गेवराई 347 केज 117 माजलगाव 64 परळी 99 पाटोदा 39 शिरूर 43 वडवणी 42
राज्याला खूप मोठा दिलासा; आज विक्रमी ८२ हजार रुग्णांची करोनावर मात
मुंबई: राज्यात काल शनिवारी विक्रमी संख्येने रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा खाली आला आहे तर त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा टक्काही थोडा वाढला आहे.
राज्यात करोना रुग्णवाढीला ब्रेक लावण्यात काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. विविध आघाड्यांवर अत्यंत नियोजनबद्धपणे काम केले जात असल्याने तसेच लसीकरणाचाही वेग वाढवला जात असल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. राज्यात काल ५३ हजार ६०५ नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी त्याचवेळी ८२ हजार २६६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ६ लाख २८ हजार २१३ इतका खाली आला आहे.
करोनाची कालची आकडेवारी
- राज्यात काल ८६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
- सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- राज्यात ५३,६०५ नवीन रुग्णांचे निदान.
- काल ८२,२६६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.०३ % एवढे.
- अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ६ लाख २८ हजार २१३ इतका आला खाली.