आजही दिलासादायक बातमी:बीड जिल्ह्यात 1359 जण झाले कोरोनामुक्त
बीड- जिल्ह्यात आज 1359 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही चांगले आहे
नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही,जिल्हा प्रशासन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1359 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे
सध्या बीड जिल्ह्यात 65152 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 57433 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 15.33% असून बरे होण्याचे प्रमाण 88.15 %आहे तर मृत्यू दर 1.65% आहे
सध्या 5918 बेड शिल्लक असून सध्या 6633 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 12556 बेडची व्ययस्था करण्यात आली आहे, आज 7 नवीन कोविड सेन्टरची व्यवस्था करण्यात आली जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 159 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे, सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 1081 रुग्ण दगावले आहेत आज दुर्दैवाने 37 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर आहे काल 1044 ही संख्या होती