लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांना आता नवा ४ आकडी सिक्युरिटी कोड
नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्यांना आता नवा ४ आकडी सिक्युरिटी कोड मिळेल. कोविन पोर्टल, कोविन अॅप अथवा आरोग्यसेतू अॅप यांच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना हा नवा ४ आकडी सिक्युरिटी कोड मिळेल. नवी व्यवस्था शनिवार ८ मे २०२१ पासून अंमलात येईल. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ४ आकडी सिक्युरिटी कोड हा पर्याय वापरण्याचा निर्णय झाला आहे.
यामुळे लसचा पहिला तसेच दुसरा डोस घेण्यासाठी कोणत्या केंद्रावर, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेच्या स्लॉटमध्ये जायचे हे लक्षात येईल. नागरिकांचा गोंधळ टळेल. सिक्युरिटी कोड नोंदणी करणाऱ्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर मेसेजच्या स्वरुपात येईल. लसीकरणाच्यावेळी हा कोड दाखवणे बंधनकारक आहे.
लसीकरण केंद्रावर सिक्युरिटी कोडची नोंद केली जाईल. यामुळे लसीकरणाच्या डेटाबेसमधील दोष दूर करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. लसीकरण प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे शक्य होणार आहे.
कोविन पोर्टल – https://www.cowin.gov.in/home
कोविन पोर्टलवर नव्याने नोंदणी करण्यासाठी – https://selfregistration.cowin.gov.in/
आरोग्यसेतू अॅप – https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu