देशनवी दिल्ली

लसीकरणाचा वेग कमी होऊ देऊ नका:पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैकीत त्यांनी करोना संसर्गाचा राज्य आणि जिल्हा निहाय आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी पायाभूत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान कार्यालयाकडून यांसंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले. लसीकरणाचा ( vaccination ) वेग कायम ठेवण्यासाठी राज्यांनी संवेदनशील होऊन काम करण्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला, असं या निवेदनात म्हटलं आहे. देशात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भा असलेल्या १ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या १२ राज्यांमधील स्थितीबाबत माहिती दिली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोनाच्या राज्य आणि जिल्हा निहाय स्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली. तसंच सर्वाधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांचीही माहिती देण्यात आली.

राज्यांकडून पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये वेगाने करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली गेली. आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन केले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. जारी केलेल्या निवेदनात हे म्हटलं आहे.

राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन, हर्षवर्धन, पीयूष गोयल, मनसुख भाई मांडविया यांच्यासह इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी यावेळी औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. त्यांना रेमडेसिवीरसह इतर आवश्यक औषधांचे उत्पादन वाढवण्यासंबंधी प्रयत्नांची माहिती दिली गेली.

लसीकरण मोहीमेचा आढावा घेत पंतप्रधान मोदींनी पुढील काही माहिन्यांमध्ये लसींच्या उत्पादन वाढवण्यावर आढावा घेतला. केंद्राकडून राज्यांना आतापर्यंत १७.७ कोटी लसीच्या डोसचा पुरवठा करण्यात आला. लसीचे डोस वाया जाण्याच्या मुद्द्यावरही मोदींनी आढवा घेतला. ४५ वर्षांवरील ३१ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला गेल्या आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *