रस्त्यावरही फिरतोय कोरोना:बीड,अंबाजोगाईत सापडले 43 कोरोना बाधीत
बीड जिल्ह्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची आज पासून कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे बीड आणि अंबाजोगाई येथे तपासण्या करण्यात आल्यानंतर जवळपास 43 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत रस्त्यावर फिरून विनाकारण कोरोना ला घरी घेऊन जाऊ नका असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे तसेच नियमांचे पालन करा असे सांगून सुद्धा अनेक जण नियमांचे उल्लंघन करत राजरोसपणे रस्त्यावर फिरताना आढळून आले आहेत त्यामुळेच प्रशासनाने वेळेच्या व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यांची जाग्यावरच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये आज दिवसभरात 43 रुग्ण आढळून आले आहेत याचा अर्थ रस्त्यावर कोरोना फिरतोय हे मात्र नक्की
आज बीड शहरात 8 ठिकाणी तर अंबाजोगाई मध्ये 5 ठिकाणी 710 तपासण्या करण्यात आल्या त्यात 43 पॉझिटिव्ह तर 667 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत