आजच्या 42 पैकी 35 निगेटिव्ह, 7 प्रलंबित
बीड
जिल्हाभरातून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या 42 संशयितांचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात आले असून काल राहिलेल्या 3 सह 45 अहवाल पाठवण्यात आले होते त्यात 35 निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत
बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात बाहेरील लोक मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यात आतापर्यंत 36 रूग्ण संख्या आढळून आली कोरोनाची बाधीत संख्या वाढत आहे यातील 6 रूग्ण उपचारासाठी पुण्याला गेले व एक रूग्ण बरा झाला आहे आज जिल्हा रूग्णालयात सध्या 29 रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातून आज 45 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यात आधी पाठवलेले 3 जणांचे रिपोर्ट अजूनही संशयित आहेत. तर मयत तरुणाचा एक स्वॅब पाठवण्यात आला होता आज एकूण 35 रुग्ण निगेटिव्ह आढळून आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे 7 रिपोर्ट प्रलंबित आहेत