बीड जिल्ह्यात आज 1512 पॉझिटिव्ह:आज बीड 277,अंबाजोगाई 271
बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4599 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1512 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3087 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 271 आष्टी 180 बीड 277 धारूर 67 गेवराई 120 केज 216 माजलगाव 32 परळी 141 पाटोदा 67 शिरूर 99 वडवणी 42
मुंबईः महाराष्ट्रात २४ तासांत ६२ हजार ९१९ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ६९ हजार ७१० जण २४ तासांत बरे झाले. कोरोनामुळे राज्यात २४ तासांत ८२८ मृत्यू झाले.
आतापर्यंत महाराष्ट्रात ४६ लाख २ हजार ४७२ कोरोनाबाधीत आढळले. यापैकी ३८ लाख ६८ हजार ९७६ जण बरे झाले. राज्यात कोरोनामुळे ६८ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांपैकी २ हजार ४३ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. सध्या महाराष्ट्रात ६ लाख ६२ हजार ६४० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. 3 हजार 523 कोरोनाग्रस्तांना कालच्या दिवसात प्राण गमवावे लागले. एकूण कोरोनाबळींचा आकडा 2 लाख 11 हजार 853 झाला आहे.
देशात 24 तासात चार लाखांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचा विक्रम नोंद झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. त्यापैकी 32 लाख 68 हजार 710 सध्या सक्रिय (अॅक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत.
1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण कोरोना उपचारानंतर बरे झालेले आहेत, ही दिलासादायक बाब आहे.