बीड जिल्ह्यात आज दिड हजारी(1520) पॉझिटिव्ह तर हजारी(1013) निगेटिव्ह
बीड- जिल्ह्यात आज दीड हजाराच्या वर पॉझिटिव्ह रुग्ण असले तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णाची संख्या हजाराच्या पुढे आजही चांगली आहे,नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही,जिल्हा प्रशासन , आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1013 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे
सध्या बीड जिल्ह्यात 54011 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 46766 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 13.84% असून बरे होण्याचे प्रमाण 86.58 %आहे तर मृत्यू दर 1.69% आहे
सध्या 4904 बेड शिल्लक असून सध्या 6331 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 11235 बेडची व्ययस्था करण्यात आली आहे, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 145 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे,सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 914 रुग्ण दगावले आहेत
दुर्दैवाने 25 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर आहे हे एकाच दिवसाचे की किती दिवसाचे हे मात्र समजू शकले नाही कालच्या रिपोर्ट मध्ये 889 ही संख्या होती