आजच्या 45 कोरोना अहवालाची प्रतिक्षा
बीड
जिल्हाभरातून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या 42 संशयितांचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात आले असून काल राहिलेल्या 3 सह 45 अहवालाची प्रतीक्षा आहे यामध्ये सर्वाधिक संशयित अहवाल बीड शहरातील आहेत
बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात बाहेरील लोक मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यात आतापर्यंत 36 रूग्ण संख्या आढळून आहे कोरोनाची बाधीत संख्या वाढत आहे. ४ दिवसापूर्वी शुन्यावर असलेला आकडा 36 वर जावून पोहचला. यातील 6 रूग्ण उपचारासाठी पुण्याला गेले व एक रूग्ण बरा झाला आज जिल्हा रूग्णालयात सध्या 29 रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातून आज ४२ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शिवाय कालचे तीन आणि मयत तरुणाचा एक स्वॅब पाठवण्यात आला आहे आज या अहवालाचा रिपोर्ट असल्याने बीडकरांची धकधक वाढली आहे.यामध्ये बीड मधून २० माजलगाव १४, आष्टी १ तर केज सात असे स्वॅब पाठवले आहेत.