लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य;कशी आणि कुठे कराल नोंदणी?
मुंबई : देशभरात एक मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. या शनिवारपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. 18 ते 44 वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की, या लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपचा वापर करु शकता. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिर्वाय असेल.
लसीकरणाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं कराल?
कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन करु शकतात.
www.cowin.gov.in या वेबसाईटवर लॉगइन करा.
Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा.
Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
जो मोबाईल क्रमांक रजिस्टर कराल त्या नंबरवर OTP येईल. तिथे टाका आणि Verify वर क्लिक करा.
Vaccine Registraction form दिसेल त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि Submit वर क्लिक करा.
तुम्ही vaccine साठी registraction केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.
त्यानंतर schedule appointment वर क्लिक करा. आणि त्यामध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिन कोड टाका.
लसीकरणासाठी Session निवडा, सकाळचे किंवा दुपारचे.
Vaccin center आणि Date निवडा.
Appointment book करुन ती confirm करा.
Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
त्यामुळे vaccination center वर vaccine देणं सोपं होईल आणि गर्दीही होणार नाही.
याच पद्धतीनं तुम्ही आरोग्य सेतू अॅपवरही रजिस्ट्रेशन करु शकता.