बीड

बीड जिल्ह्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली:आज 952 जणांना डिस्चार्ज

बीड- जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे,नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 952 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

सध्या बीड जिल्ह्यात 48478 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 41840 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 12.97 असून बरे होण्याचे प्रमाण 86.48 %आहे तर मृत्यू दर 1.76% आहे

सध्या 4364 बेड शिल्लक असून सध्या 5686 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 126 ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून 10050 बेड बीड जिल्ह्यात आहेत, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत आज पुन्हा नवीन 4 कोविड केअर सेन्टर उपलब्ध करण्यात आले आहेत सध्या जिल्ह्यात 126 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे,सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 852 रुग्ण दगावले आहेत दुर्दैवाने 8 जणांचा मृत्यू झाला आहे