बीड

बीड शहरात मोबाईल लुटणारी टोळी गजाआड:एक मोटारसायकल व 9 मोबाईल जप्त

बीड शहरातील पायी चालताना तसेच मोटरसायकल वर मोबाईलवर बोलताना धुम स्टाईलने मोबाईल लुटणारी टोळी पोलिसांनी काल दि 24 रोजी गजाआड केली आहे आरोपिकडून एक मोटारसायकल आणि 9 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

बीड जिल्हयात काही दिवासा पासुन अंधाराचा फायदा घेवून पायी तसेच मोटर सायकलवर मोबाईलवर बोलत चाललेल्या इसमांच्या हातातील मोबाईल मोटर सायकल वर येवून हिसकावून घेवून धूम स्टाईलने पळुन जाणाऱ्या घटनेमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी, कर्मचारी यांना सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. अशा प्रकारच्या गुन्हयाच्या संदर्भाने आरोपी बाबत माहिती घेत असताना पो.नि स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, बीड शहरामधील पेठ बीड भागातील रोहित लक्ष्मण काळे रा. एकता नगर, बीड हा त्याचे दोन साथीदारासह सदरचे गुन्हे करीत आहे. आशी खात्री लायक माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील अधिकारी व कर्मचारी यांना नेमून नाळवंडी नाका, बीड येथे सदर आरोपीना पकडण्या करीता सापळा लावून इसम
नामे रोहित लक्ष्मण काळे यास ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, तो व त्याचा मित्र प्रविण विठठल नाडे व एक विधीसंघर्ष बालक असे तिघे मिळुन मोटर सायकल वर जावुन गेली एक ते दिड महिण्यापासुन बीड शहरातील नगर रोड पंचायत समिती समोरुन तसेच जालना रोडवरील जिरेवाडी , कॅनॉल रोड, अंबिका चौक, भाजी मंडई, स्टेडीयम अशा विविध ठिकाणावरुन फोनवर बोलत पायी चालत जात असताना तसेच मोटर सायकलवर फोनवर बोलत असताना मोटर सायकलवर पाठीमाघून येवून लोकांचे मोबाईल हिसकावून घेवून पळून गेलेले आहेत.
सदर आरोपी यांचेकडुन गुन्हयातील वापरलेली 01 मोटरसायकल व चोरी केलेले 09 मोबाईल असा एकुण 1,43,000/- रुपये किमती मुद्येमाल जप्त केला आहे.

जप्त करण्यात आलेले मोबाईल खालील प्रमाणे.

1.सॅमसंग गॅलक्सी A-9 मोबाईल काळ्या रंगाचा ज्याचा IMEI NO.1)353451101238861/01 ,29353452101238869/01
2.विवो कंपनीचा 1915 मोबाईल आकाशी रंगाचा ज्याचा IMEI NO.1)869846044578439
2)869846044578421
3.विवो कंपनीचा A-2S मोबाईल निळ्या रंगाचा ज्याचा IMEI NO.1)864307056819273
2)864307056819265
4.विवो कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल ज्याचा IMEI NO.1)868907032835073
2)868907032835065
5.पोको कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल ज्याचा IMEI NO.1)862172055744431
2)862172055744449
6.विवो कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल ज्याचा IMEI NO.1)861786042546053
2)861786042546046
7.सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा स्क्रिन लॉक असलेला मोबाईल
8.MI कंपनीचा सिलव्हर रंगाचा बंद असलेला मोबाईल

  1. MI कंपनीचा सिलव्हर व पांढ-या रंगाचा मोबाईल ज्याचा IMEI NO-
    1)866469035196740 2)866469035196757
    वरील प्रमाणे मोबाईल जप्त करुन अभिलेख तपासला असता पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे दिनांक 09/04/2021 रोजी गुरनं 130/2021 कलम 392,34 भादवि प्रमाणे एक गुन्हा दाखल असुन
    सदर गुन्हया मध्ये आरोपी व मुद्येमाल देण्यात आलेला आहे. तरी सर्व जणतेस आव्हान करण्यात येते
    की, ज्या लोकांचे मोबाईल हिसकावून घेवून पळून गेले आहेत. अशा लोकांनी वरील मोबाईल ,IMEI NO तपासुन जर वरील प्रमाणे मोबाईल व IMEI NO असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथे संपर्क करावा.सदरची कामगिरी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस अधीकारी व पोलीस अमंलदार यांनी केली आहे.