बीड

बीड जिल्ह्यात आज 1237 पॉझिटिव्ह:सर्वाधिक रुग्ण बीड अंबाजोगाई तालुक्यात

बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4779 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1237 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3542 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 225 आष्टी 130 बीड 232 धारूर 72 गेवराई 117 केज 129 माजलगाव 62 परळी 74 पाटोदा 68 शिरूर 69 वडवणी 59

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.
राज्यातील करोनाची शनिवार रोजीची आकडेवारी

  • राज्यात आज ६७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.५१% एवढा आहे.
  • आज राज्यात ६७ हजार १६० नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ६३ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • आजपर्यंत एकूण ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्ण करोनामुक्त.
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ८२.०२ टक्के.

देशात गेल्या एका दिवसात आणखी तीन लाख ४६ हजार ७८६ जणांना करोनाची लागण झाली असून हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ६६ लाख १० हजार ४८१ वर पोहोचली आहे तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने २५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे, त्याचप्रमाणे एका दिवसात आणखी २६२४ जणांचा मृत्यू झाला आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या एका दिवसात २६२४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ८९ हजार ५४४ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असून आता ही संख्या २५ लाख ५२ हजार ९४० वर पोहोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १५.३७ टक्के इतके आहे

देशात आतापर्यंत एक कोटी ३८ लाख ६७ हजार ९९७ जण करोनातून बरे झाले असून मृत्युदरही कमी होऊन तो १.१४ टक्क्यांवर आला आहे. देशात एका दिवसात २६२४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला