कोरोना सदृश्य तापावर होमिओपॅथीचे ऍकोनाईट उपयोगी-डॉ अरुण भस्मे
बीड (प्रतिनिधी) दि 24: होमिओपॅथीमधील बेलाडोना व यूपीटोरिअम इतकेच ऍकोनाईट नॅपलस हे कोरोनाच्या प्राथमिक अवस्थेतील लक्षणावर प्रभावी काम करू शकते असे बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ अरुण भस्मे यांनी सांगितले
आपणास आश्चर्य वाटेल एवढी प्रचंड शक्ती होमिओपॅथी औषधामध्ये आहे परंतु महाराष्ट्रात या पॅथीला राजाश्रय नाही,हे दुर्दैव आहे कोरोनाच्या प्राथमिक अवस्थेत म्हणजे ताप, भयंकर डोके दुखी यावर ऍकोनाईट हे सुद्धा प्रभावी काम करू शकते,यामध्ये विशेषता डोके भयंकर दुखते, थंड व उष्ण वातावरणातून आल्यावर जर ताप आला असेल,गाल आळीपाळीने लाल अथवा पांढरा होणे,खूप तहानअसेल, थंड पाणी प्यावेसे वाटणे,कितीही पिले तरी तहान क्षमत नाही तसेच अस्वस्थ, हूरहूर वाटने,आपला मृत्यू होईल आपण वाचणार नाही एवढेच नव्हे तर कधी मरणार हे सुद्धा पेशंट सांगतो अशी लक्षणे असल्यास हे हमखास उपयोगी पडते, वरील प्रकारची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित होमिओपॅथी डॉक्टरांशी सम्पर्क साधावा,
हे औषध बचनाग या विषारी वनस्पती पासून तयार करतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे गरजेचे आहे,या औषधीच्या चार चार गोळ्या दिवसातून तीन वेळा घेतल्याने ताप उतरतो व डोके दुखणे कमी होते,लक्षणे कमी झाल्यास पुन्हा घ्यायची आवश्यकता नाही.कमी न झाल्यास मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी वरील प्रमाणे घ्यावे,याचे काहीच दुष्परिणाम नाहीत,कारण ही औषधे मर्दनी करणाच्या प्रक्रियेमुळे त्यातील भौतिक गुणधर्म नाहीसे करून औषधीय गुणधर्म प्रगट होतात,ही औषधे होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले तर ते अजून चांगले म्हणजे कोणती पोटंसी वापरावी किती डोस द्यावे याचे मार्गदर्शन होईल,
म्हणून कोविद च्या औषधाबरोबर याचाही चांगला उपयोग होऊ शकतोहोमिओपॅथी मध्ये रोगावर ईलाज न करता लक्षणांच्या समूहावर आधारित औषयी योजना करतात,या औषधाची लक्षणे कोरोनाच्या प्राथमिक अवस्थमध्ये असलेल्या लक्षणाशी जुळतात,त्यामुळे हे औषध कोरोनाच्या प्राथमिक अवस्थेत उपयोगी पडू शकते