अंबाजोगाईबीड

अंबाजोगाईमध्ये 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू-अधिष्ठाताकंडून वेगळाच खुलासा

अंबाजोगाई- अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कोविंड रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून केवळ ऑक्सिजन कमतरतेमुळेच रुग्ण दगवल्याचा नातेकवाईकांनी आरोप केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दावा फेटाळून लावला आहे.

ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे.
ऑक्सिजन अभावी बीड जिल्ह्यातील परिस्थितीत गंभीर होऊ लागली आहे

दरम्यान स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी या वृत्ताबाबत खुलासा केला आहे

स्वा रा ती रुग्णालयात 11 रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला असल्याचे माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे मात्र दिनांक 21 रोजी रात्री बारा वाजे पासून आत्तापर्यंत या रुग्णालयात एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे तो झाला असल्याचे दिसून येते तसेच त्यांना दमा, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, इत्यादी शारीरिक व्याधी असल्याचे दिसून आले आहे परंतू समाज माध्यमांमध्ये स्वरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झालेला आहे अशा बातम्या येत आहेत रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लोखंडी सावरगाव बीड लातूर औरंगाबाद नांदेड व जालना या ठिकाणाहून जम्बो सिलेंडर तसेच लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पाठपुरावा केला जात आहे सध्या रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी कळवले आहे आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालात जी मृत्यूची संख्या दाखवण्यात आली आहे ती आणि तिच्या अधिष्ठान कडून कळवण्यात आलेली आकडेवारी यात मोठी तफावत आहे बीड जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण झाकले जात आहे की काय अशीही चर्चा आता होऊ लागली आहे