बीड

बीडकरानो आजही खुश खबर:जिल्ह्यात 904 रुग्ण झाले कोरोनामुक्त

बीड- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत आहे तर दुसरीकडे मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 904 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 85.95 टक्के इतका आहे सध्या बीड जिल्ह्यात 3593 बेड शिल्लक असून सध्या 5197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 109 ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून 8790 बेड बीड जिल्ह्यात आहेत,

जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत बीड जिल्ह्यात आतापर्यंत 42505 बाधित रुग्णांची संख्या असून यापैकी 36537 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे आता बीड जिल्ह्याचा पॉझिटिव रेट 12.13 टक्के इतका आहे जिल्ह्याची रुग्ण वाढ दिसत असली तरी करोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील समाधान कारक आहे

आज पुन्हा नवीन 4 कोविड केअर सेन्टर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत सध्या जिल्ह्यात 109 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे