बीड

बीड जिल्ह्यात आज 1024 पॉझिटिव्ह:बीड 206 अंबाजोगाई 231 आष्टी 111 ,केज 122,परळी 101

बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4108 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1024 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3084 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 231 आष्टी 111 बीड 206 धारूर 50 गेवराई 45 केज 122 माजलगाव 50 परळी 101 पाटोदा 47 शिरूर 46 वडवणी 15

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 58 हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 52 हजार 412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के झाले आहे.

राज्यात सोमवारी एकूण 351 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.5६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 824 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोंद झालेल्या 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 85 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.

देशात २४ तासांत आढळले २ लाख ५९ हजार १७० करोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी (१९ एप्रिल २०२१) रोजी एकूण २ लाख ५९ हजार १७० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच २४ तासांत देशात १ हजार ७६१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर १ लाख ५४ हजार ७६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ०८९ वर पोहचलीय. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ८० हजार ५३० नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २० लाख ३१ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ५३ लाख २१ हजार ०८९
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ३१ लाख ०८ हजार ५८२
उपचार सुरू : २० लाख ३१ हजार ९७७
एकूण मृत्यू : १ लाख ८० हजार ५३०
करोना लसीचे डोस दिले गेले : १२ कोटी ७१ लाख २९ हजार ११३