मोठी बातमी! राज्यात पूर्ण लाॅकडाऊनची शक्यता? अनेक जिल्ह्यांत अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसाठी ठराविक वेळ
मुंबई – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांची गुरुवारी रात्रीपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. मात्र, करोनाला ब्रेक लागण्याऐवजी दररोज नव्या रुग्णांचा विक्रमी आकडा पाहयला मिळत आहे. म्हणून आता पूर्ण लाॅकडाऊनची मागणी जोर धरत आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांकडे पूर्ण लाॅकडाऊनची मागणी केलीय.
या शहरांत कडक निर्बंध –
नांदेड – मेडिकल सेवा वगळता इतर अत्यावश्य सेवा सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु.
औरंगाबाद – अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु.
अहमदनगर – 14 दिवस अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिवसात 4 तासच सुरु राहणार.
सोलापूर – मेडिकल सेवा वगळता इतर अत्यावश्यक सेवा दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु.
दरम्यान, पूर्ण लाॅकडाऊनशिवाय करोना संसर्ग आटोक्यात येणार नाही. सर्वांचीच पूर्ण लाॅकडाऊन करण्याची मागणी आहे. या संदर्भातील पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिलीय. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही पूर्ण लाॅकडाऊन गरजेचे असल्याचे म्हटले आहे.