बीड जिल्ह्यात आजचा आकडा हजारी पार:1005 पॉझिटिव्ह:बीड 348 अंबाजोगाई 142 आष्टी 168,,केज 98
बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3655 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1005 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 142 आष्टी 168 बीड 348 धारूर 29 गेवराई 67 केज 98 माजलगाव 60 परळी 29 पाटोदा 21 शिरूर 21 वडवणी 22
राज्यात गुरुवारी ६१ हजार ६९५ रुग्ण आणि ३४९ मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५ झाली असून बळींचा आकडा ५९ हजार १५३ इतका आहे.
सध्या राज्यात ६ लाख २० हजार ६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात मागील २४ तासांत ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३ टक्के आहे.
सध्या राज्यातील मृत्युदर १.६३ टक्के आहे.
देशभरात 24 तासात दोन लाखाचा आकडा पार
देशात गेल्या २४ तासांत देशात २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. दररोज सरासरी १० ते १५ हजार रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारी दिवसभरात सापडलेल्या रुग्णांसह कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ४२ लाख ९१ हजार ९१७ झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात ११८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७४ हजार ३०८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
सध्या देशभरात १५ लाख ६९ हजार ७४३ लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. तसेच आतापर्यंत १ कोटी २५ लाख ४७ हजार ८६६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.