प्रासंगिकबीड

नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज सहकार्य करा- उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोविडच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस भयावह पद्धतीने वाढत असून काही तालुक्यातील संक्रमणाचे प्रमाण हे अत्यंत मोठे आहे अशा परिस्थितीत प्रशासन हे सर्व मार्गाने या आपत्तीला तोंड देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाही किंवा अत्यंत सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांत करता कोविड केअर सेंटर ची स्थापना करण्यात आलेली असून ज्या रुग्णांना कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घ्यायचे आहेत अशा रुग्णां करता प्रत्येक तालुक्याच्या पातळीवर पुरेशा संख्येने केअर सेंटरची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोविड हेल्थ केअर सेंटर आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा असलेले बेड त्याचबरोबर तज्ञ वैद्यकीय डॉक्टरांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जिल्हा प्रशासन नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न करत आहे बीड जिल्ह्यातील सुजाण नागरिकांच्या मदतीने या आपत्तीवर आपण मात करू व सर्वजण एकदिलाने प्रयत्न करू असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे

खाली दिलेल्या मोबाईल नंबर ऐवजी हा 8446165371 आहे. याची नोंद घ्यावी