राज्यात कडक लॉकडाउन लागू होण्याची शक्यता?मुख्यमंत्र्यांनी बोलावली उद्या सर्व पक्षीय बैठक
राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असली आणि ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोना काही आटोक्यात येईना. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाउन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या सर्वपक्षीय बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.

पुढील आठवड्यात सार्वजनिक सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.
शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून वीकेंड लॉकडाउनला सुरुवात होईल. पुढचे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहतील. पण वाहतुकीची साधनं जसे रेल्वे सेवा, बस, रिक्षा सुरू राहतील.
- हॉटेलमधून होम डिलिवरी सुरू राहील. पण हॉटेलमध्ये बसून खायला बंदी
- विनाकारण बाहेर हिंडून नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
- मास्कशिवाय फिरणं, पाचपेक्षा अधिक जणांनी एकत्र येणं यावर बंदी. उल्लंघन केलं तर कठोर कारवाई.