बीड

बीड जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढीचा उच्यांक: 732 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 127 आष्टी 127,बीड 216

बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6496 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 732 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5764 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 127 आष्टी 127 बीड 216 धारूर 17 गेवराई 55 केज 67 माजलगाव 35 परळी 48 पाटोदा 26 शिरूर 6 वडवणी 8

राज्यात ५६ हजार २८६ नव्या रुग्णांचे निदान

गेल्या २४ तासांत राज्यात ५६ हजार २८६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५९ हजार ९०७ इतकी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी घट झाली असून ही घट ३ हजार ६२१ इतकी आहे, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३६ हजार १३० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ३० हजार २९६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख २१ हजार ३१७ वर जाऊन पोहचली आहे.

आज राज्यात एकूण ३७६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३२२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३६ हजार १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २६ लाख ४९ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०५ टक्क्यांवर आले आहे.

देशात रुग्णवाढीचा रेकॉर्ड
देशात गेल्या 24 तासांत 1.15 लाखहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर कार 630 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 1 लाख 15 हजार 736 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 28 लाख 1 हजार 785 वर पोहोचला आहे. सध्या देशात 8 लाख 43 हजार 473 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. तर 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे.