मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय:30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध
राज्यातील कोरोना रुग्णवाढ लक्षात घेता आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळा ची तातडीची बैठक बोलावली होती,या बैठकीत अखेर संपूर्ण लॉक डाऊन ऐवजी कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला होता,राज्यातील तज्ञांच्या आणि विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेऊनच निर्णय घेऊ असे सांगितले होते
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी तज्ज्ञांकडून पर्याय जाणून घेतले. वृत्तपत्रांचे मालक, संपादक, वितरक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत संपर्क साधला. तसंच, व्यायामशाळातील मालक, संचालत, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. तसंच, सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
आजच्या बैठकीत लॉकडाऊन नको असा अनेक मंत्र्यांनी अशी सूचना केली व कडक निर्बंन्ध लागू करावेत असा निर्णय घेण्यात आला
राज्यात 30 एप्रिल पर्यंत कठोर निर्बंध लागू केले जाणार आहेत थोड्याच वेळात अधिक माहिती देण्यात येईल