बीड

बीड जिल्ह्यात आज 434 कोरोना पॉझिटिव्ह:आज अंबाजोगाईत 112 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2959 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 434 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2525 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळातच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे ही चिंतेची बाब आहे आज अंबाजोगाई मध्ये रुग्ण वाढ झाली आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 112 आष्टी 63 बीड 95 धारूर 4 गेवराई 13 केज 22 माजलगाव 30 परळी 54 पाटोदा 23 शिरूर 12 वडवणी 6

देशातील करोना संक्रमणाची परिस्थिती पुन्हा चिंताजनक

नवी दिल्ली : भारतात करोना संक्रमणावर नियंत्रण येतंय असं वाटत असतानाच परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचं दिसून येतंय. देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या तब्बल ८९ हजार १२९ वर गेलीय. यामुळे आतापर्यंतच्या एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी २३ लाख ९२ हजार २६० वर पोहचलीय.
गेल्या सात महिन्यांमध्ये आढळलेला हा सर्वात मोठा आकडा आहे. या अगोदर २० सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात संक्रमणबाधित ९२ हजार ६०५ रुग्ण आढळले होते.