बीड

बीड जिल्ह्यात आजचा आकडा 383 कोरोना पाठ सोडेना :बीडला 108 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2679 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 383 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2296 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,विशेष म्हणजे लॉक डाऊन च्या काळातच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे ही चिंतेची बाब आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 84 आष्टी 39 बीड 108 धारूर 16 गेवराई 13 केज 38 माजलगाव 29 परळी 18 पाटोदा 29 शिरूर 10 वडवणी 9

मुंबई: राज्यात दररोज नव्या करोना (Coronavrus) बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून आज पुन्हा एकदा नव्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येने उचल खाल्ली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४३ हजार १८३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३९, हजार ५४४ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ३ हजार ६३९ ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२ हजार ६४१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २३ हजार ६०० इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ वर जाऊन पोहचली आहे.