बीड

कोरोनाचा कहर चालूच:आज जिल्ह्यात 386 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2209 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 386 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1823 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 75 आष्टी 41 बीड 172 धारूर 9 गेवराई 13 केज 9 माजलगाव 14 परळी 29 पाटोदा 11 वडवणी 7,शिरूर 6

मुंबई: राज्यात दिवसागणिक अधिकाधिक नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान होत असून आजही धडकी भरवणारा आकडा समोर आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३५, हजार ७२६ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ४ हजार ६८८ ने अधिक आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण १७ हजार ८७४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या १४ हजार ५२३ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख २५ हजार ९०१ वर जाऊन पोहचली आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest updates)
आज राज्यात एकूण १०८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १६६ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के इतका आहे. राज्यात आज १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे.