गेवराईबीड

चकलंबा येथील रोकडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू:भाविकांच्या हातभाराची गरज

बीड-जिल्ह्यातच नव्हे तर सम्पूर्ण राज्यात सलग 138 वर्षाची नाट्य परंपरा सुरू असलेल्या श्री रोकडेश्वर अर्थात श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार भाविकांच्या मदतीने सुरू आहे,भव्य स्वागत कमानी नंतर आता मंदिराच्या गाभाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे,हे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास 10 लाखाचा खर्च येणार असून आतापर्यंत 5 लाखाचा निधी भाविकांनी जमा केला आहे उर्वरित निधी जमा होणे गरजेचे आहे भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मंदिर जीर्णोद्धार समितीने केले आहे

चकलंबा या गावी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री रोकडेश्वर मंदिर आहे मंदिराच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा पुरातत्त्व खात्याकडे मागणी केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले तत्कालीन आमदार बदामराव पंडित,अमरसिंह पंडित व श्रीकांत जोशी यांच्या स्थानिक निधीतून सभागृहाचे काम करण्यात आले,तसेच विद्यमान आ लक्ष्मण पवार यांनी फेव्हर ब्लॉक साठी निधी उपलब्ध करून दिला,मात्र आणखी बरेच काम होणे बाकी आहे,

जी मूर्ती आहे त्या ठिकाणी अरुंद जागा असल्याने ती वाढवणे गरजेचे होते त्यामुळे हा गाभारा मोठा करून सुशोभित आणि कोरीव काम सुरू करण्यात आले आहे या कामासाठी जवळपास 10 लाखाची गरज आहे गावातील स्थानिक भाविकांच्या मदतीने 5 लाखाचा निधी जमा झाला असून उर्वरित आणखी 5 लाखाची गरज आहे ज्या भाविकांनी निधी दिला नसेल त्यांनी तो थेट समितीच्या नावाने जमा करावा जेणे करून कामाला गती मिळेल,दर वर्षी चैत्र पौर्णिमेला 3 दिवसाचा मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच सलग 138 वर्षांपासून गावातील कलाकार मंडळी सामाजिक,कौटुंबिक अशी नाटकाचे प्रयोग सादर करत असतात मात्र कोरोना काळात गेल्या वर्षी उसत्व होऊ शकला नाही आणि पुढील महिन्यात होईल की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे सध्या मंदिराच्या गाभाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे,भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!