बीड

बीडला आज शंभरी पार:तर जिल्ह्यात 299 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2056 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 299 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1757 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 80 आष्टी 15 बीड 104 धारूर 4 गेवराई 16 केज 30 माजलगाव 19 परळी 14 पाटोदा 7 शिरूर 4 वडवणी 6

गेल्या 24 तासांत राज्यात 28,699 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर 13,165 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 132 लोकांचा बळी गेला आहे. सोमवारी राज्यात 25 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले होते, तर रविवारी हा आकडा 30 हजारांच्या पुढे गेला होता. त्यामुळे रुग्णसंख्या कमी-जास्त होताना दिसतेय. राज्यात आतापर्यंत 25,33,026 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 22,47,495 लोकांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 53,589 लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय. सध्या राज्यात 2,30,641 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सकाळी जारी केलेल्या नव्या आकडेवारीनं थोडाफार दिलासा दिला आहे. मागील २४ तासांत देशात ४० हजार ७१५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या1,16,86,796 झाली आहे. मागील २४ तासांत १९९ रुग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण मृत्यूची संख्या एक लाक ६० हजार १६६ इतकी झाली आहे.