बीड

लॉकडाऊन:जिल्ह्यात की फक्त काही शहरातच;काय होऊ शकतो निर्णय

बीड जिल्ह्यात वाढते रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आता लॉक डाउन करण्याच्या विचारात आहे मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात तो भाग कंटेनमेंटझोन म्हणून जाहीर करावा तसेच त्या भागातील रुग्णांच्या सहवासात येणाऱ्यांच्या तपासण्या कराव्यात असे निर्देश आहेत

बीड जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याच्या विचारात प्रशासन असले तरी यासाठी विरोध देखील होऊ लागला आहे जर लॉक डाऊन लागू करण्यात आला तर तो कोणत्या निकषावर लागू शकतो याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागेल

संपूर्ण जिल्ह्यात तशी परिस्थिती आहे का काही तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या कमी आहे तर काही ग्रामीण भागात रुग्ण संख्या नसल्यातच जमा आहे मग अशा ठिकाणी लॉकडाउन लागू करता येईल का हादेखील मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे लॉक डाऊन लागू करण्याचे काही निकष आहेत हे निकष विचारात घेऊन जर प्रशासनाने बीड जिल्ह्यात लॉक डाऊन चा निर्णय घेतला तर तो फक्त ज्या ठिकाणी अधिक रुग्ण वाढ आहे तोच भाग लॉकडाऊन होऊ शकतो

जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये सरासरी विचार करता फक्त काही शहरातच लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र सरसकट संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करणे योग्य होणार नाही गेल्या वर्षभरापासून जनता कोरोना काळात कसेबसे आपले जीवन जगत आहे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचा ही आता विचार करावा लागेल लॉक डाऊन लागू करत असताना सर्वसामान्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे अनेक छोटे छोटे व्यापारी या संकटातून सावरत आता पुढे व्यवसाय करत आहेत

लॉकडाउन सरसकट लागू झाला तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ नक्कीच येणार हे देखिल तितकेच खरे यापुढे लॉक डाऊन साठी नागरिकांमध्ये फारसे सकारात्मक विचार नाही लॉक डाऊन ला विरोध करून जनता रस्त्यावर उतरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आज होणाऱ्या निर्णयामध्ये बीड जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करत असताना ज्या ठिकाणी अधिक रुग्ण संख्या आहे तोच भाग लॉक डाऊन करण्यात यावा असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे सरसगट लॉक डाऊन लागू करणे शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला परवडणारे नाही हे देखिल तितकेच खरे

आज होणाऱ्या निर्णयांमध्ये सारासार विचार करता सध्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत वाहतूक व्यवस्था चालू राहणार की बंद ठेवणार याचाही निर्णय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमके काय चालू ठेवणार किंवा काय बंद करणार यासाठी नागरिक सकारात्मक आहेत का हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे