ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

राज्यातील ‘या’जिल्ह्यात 25 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नांदेडमध्ये 25 मार्चपासून 5 एप्रिलपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. याकाळात वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सेवांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली आहे.

जाणून घ्या काय सुरू काय बंद राहणार –

1 उद्याने, बगिचे पूर्णत: बंद राहणार, माॅर्निंग वाॅकला प्रतिबंध.
2 हाॅटेल, लाॅज, माॅल, मार्केट पूर्णत: बंद. घरपोच पुरवठा करता येणार.
3 सलून, ब्युटी पार्लर दुकाणे पूर्णत: बंद.
4 सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी पूर्णत: बंद.

अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक\ वैद्यकिय कारणास्तव अॅटोमध्ये 2 व्यक्तींना परवानगी राहील.
5 शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, शिकवणी क्लासेस पूर्णत: बंद.
6 सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादींसाठी पूर्णत: बंदी.
7 बांधकाम \कंट्रक्शनची कामे पूर्णत: बंद.
8 चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाट्यगृह, बार , पूर्णत: बंद.
9 मंगल कार्यालये, हाॅल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ पूर्णत: बंद.

खालील अत्यावश्यक सेवा मर्यादीत स्वरूपात व निर्बंधासह सुरू राहतील

1 सर्व किराणा दुकाने दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील.
2 दुध विक्री सकाळी 10 वाजेपर्यंतच सुरु राहील.
3 भाजीपाला व फळांची विक्री 7 ते 10 वेळेत.
4 सर्वा खाजगी व वैद्यकीय सेवा नियमीत वेळेनुसार सुरु राहतील.
5 इ काॅमर्स सेवा घरपोच सुरू राहील.
6 पेट्रोलपंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच इंधन मिळेल. सोबत ओळखपत्र असणे बंधनकारक.
7 वृत्तपत्रसेवा सुरू राहील.
8 अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी.